मराठी 2023-06-01T16:43:48+00:00

ग्राम ऊर्जा ही संस्था भारतातील दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांसाठी वीज, पाणी आणि
स्वयंपाकासाठीचे इंधन पुरविणार्‍या प्रकल्पांची शाश्वत तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतीच्या
आधारे उभारणी करते.

एक हजार पेक्षा अधिक गावांमध्ये जाऊन, तेथील लोकसमूहांची ऊर्जेची आवश्यकता लक्षात
घेतल्यानंतर आता आम्ही ७१० पेक्षा अधिक सामुदायिक ऊर्जा प्रकल्पांद्वारे सुमारे १५०,०००
लोकांपर्यंत पोहोचलो आहोत.

ग्रामीण उर्जेसंबंधी उपाययोजना

0
सौर मायक्रो ग्रीड
0
सौर पंप
0
स्वयंपाकासाठी बायोगॅस ग्रीड
0
इतर प्रकल्प

दुर्गम व ग्रामीण भागातील ऊर्जेविषयीच्या स्थानिक समस्यांवर मार्ग काढताना अभिनव  पद्धतीने  विचार  करून  ह्या उपाययोजना प्रत्यक्षात आणल्या आहेत.त्यायोगे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उपजीविका, महिला सशक्तीकरण, मनोरंजन आणि दूरसंवाद या विविध घटकांवर त्याच्या प्रभाव पडून लोकांचे जीवनमान उंचावताना दिसत आहे.

ग्रामीण उर्जेसंबंधी उपाययोजनांचा परिणाम

0
 जनसंख्येला लाभ
0
     प्रकल्प

ऊर्जा ही केवळ सहाय्यक आहे. ऊर्जेसंबंधीच्या उपाययोजनांमुळे झालेला परिणाम मोजण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने झालेला त्याचा विकास हे परिमाण वापरले आहे.

कार्यपद्धती

आम्ही बहुतांश वेळा सामुदायिक पद्धतीने चालविले जाणारे, स्थानिक पातळीवर
उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतील अशी अपेक्षा असलेले तसेच दीर्घकाळ आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत असे प्रकल्प साकारण्यावर भर देतो.

Circle of Success

सहकारी

मान्यता / प्राप्त पुरस्कार

प्रतिक्रिया

आता मला रॉकेलचा दिवा हातात घेवून घरातील वस्तू शोधण्यासाठी वेड्यासारखे फिरावे लागत नाही. माझे घर जास्त व्यवस्थित आणि नीटनेटके झाले आहे. मी आता गावातील लोकांसाठी शिवणकाम करते. आणि मला घरकाम करूनही त्यासाठी बराच वेळ मिळतो; अगदी रात्री सुद्धा. २४ तास वीजेचा पुरवठ्यामुळे मी आता निश्चिंत झाले आहे.

लक्ष्मी धेमटू गौडा, विरल, जोइडा, कर्नाटक

मी चालवित असलेल्या पिठाच्या गिरणीमधून आणि माझी पत्नी चालवित असलेल्या दुकानामधून आम्हाला आता उत्पन्न मिळत आहे. दुकान तर पूर्वीसुद्धा होते; पण ते दिवस मावळल्यावर बंद करावे लागे. शेतावरून उशिरा घरी आले तरी लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू आता विकत घेणे शक्य झाले आहे. पिठाच्या गिरणीसाठी आता दूर जावे लागत नाही.

मोतीलाल धांडेकर, खोकमार, मेळघाट, महाराष्ट्र

खाजगी – सामाजिक उपक्रम या नात्याने, सार्वजनिक – खाजगी – विना नफा तत्वावर ग्रामसमूहांबरोबर भागीदारी करण्यावर या संस्थेचा भर आहे. याबरोबरच ‘ग्रामस्थांचा सहभाग आणि त्यांना जबाबदारीची जाणीव असणे’ हे माझ्या मते या उपाययोजना दीर्घकाळ चालण्याची शाश्वती आणि त्यांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी कारणीभूत आहेत. ग्राम ऊर्जा या संस्थेला त्यांचे काम शेकडो, हजारो दुर्गम गावांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझ्या शुभेच्छा.

अपर्णा कात्रे, सहाय्यक प्राध्यापक, कल्चरल आंत्रप्रेनरशिप – डिपार्टमेंट ऑफ फॉरिन लॅंग्वेज अँड लिटरेचर, यूनिवर्सिटी ऑफ मिनिसोटा डुलुथ, यूएसए